Sunday, 6 January 2019

*बौध्द असण्याचे फायदे*
👍🏻👍🏻👍🏻

👉🏻1.  देवाची आणि भुतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.

👉🏻2.  संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.

👉🏻3.  केस कापताना "आज कुठला वार आहे?", ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.

👉🏻4.  घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.

👉🏻6.  कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !

👉🏻7.  मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.

👉🏻8.  लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात.

👉🏻9.  बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.

👉🏻10.  पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी बिनधास्त भांडता येत… गरजच काय या मेल्यांची मला?

👉🏻11.  उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.

👉🏻12.  बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.

👉🏻13.  सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.

👉🏻14.  कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते.

👉🏻15.  सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात… झेंडा बघायचीही गरज नाही.

👉🏻16.  स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.

👉🏻17.  सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.

👉🏻18.  'अलिफ-लैला' असो की 'जय मल्हार', 'रामायण', 'महाभारत' असो … सगळ्या सिरियलच्या मूर्खपणावर मस्त हसता येते.

👉🏻19.  कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते... नास्तिक सर्वमान्य आहेत !

👉🏻20.  धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.

👉🏻21.  प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.

👉🏻22.  "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.

👉🏻23.  रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…

👉🏻24.  दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.

👉🏻25.  घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्‍या कुणाला *स्वयंघोषित* 'माझी आई - माझा बाप' बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही
.

👉🏻26.  चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते...
डोकं गहाण ठेवून कुण्या *बुवाबाबांच्या* नादाला लागण्याची
आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या *मूर्खपणाची* खात्री पटवून देण्याची गरज नसते.

👉🏻27.  स्वतःचे *कष्टाचे* पैसे वायफळ प्रवास खर्च" करण्यापासून वाचवता येतात.
 *देवस्थानांचे* भले  करण्यापेक्षा आणि पुजार्‍याचे पोट भरण्यापेक्षा स्वत: चा कामामध्ये  करता  येते.  त्या पैशाचा *सदुपयोग* करून आपला *सर्वांगीण* विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
.
.
.

हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
😋😋😊🙂

म्हणुनच बाबासाहेबांनी आम्हाला पाखंड, अंधश्रध्दा यांना मागे सोडणारा बुद्ध धम्म दिला..बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏

No comments:

Post a Comment