💥💥💥
तुम्ही जिथे जाल तिथे (किंवा तुमच्या आधी - तुमचे नाव कळताच) तुमच्या बद्दल मत आधीच तयार झालेले असते. जर तुमचे आड़नाव खालच्या दर्जाचे असेल तर बघणाऱ्यांच्या डोळ्यात त्या काळपट रंगाचा चष्मा चढला जातो आणि त्याच चष्म्याने सम्पूर्ण व्यवहार होतो. तुम्ही कितीही क्रियाशील, कौशल्यवान असाल तरी कैक ठिकाणी तो काळपट चष्मा उतरवाला जात नाही. बालपणी नाही, पण लहानपणचे मित्र देखील विविध विषमतवादी संघटनांच्या प्रभावात येऊन निखळ मैत्री सोडून देतात.
म्हणजेच...
🌀जात व्यवस्था ही आडनावच्या स्वरुपात जीवंत पणे स्वैर फिरत आहे.🌀
💥💥💥
जात नाही ती जात ... हे खरे आहे ...
🌀पण आडनावे बदलली तर इतक्या स्वैर स्वरुपात तरी फिरणार नाही.🌀
कारण जात आडनावात उघडी होते.
👹 शाळा कॉलेजात काही शिक्षक जातींच्या गर्वाने निवडक विद्यार्थ्यांना त्रास देतात.
👹 इतर विद्यार्थी देखील त्रास देतात.
👹 कधी व्यवसाय आडनावावर चालतात किंवा लॉबिंग ने बंद पाडली जातात.
👹 मुले-मुली आडनाव बघुन शोधली जातात.
👹 अनेकदा लोक आडनावे बघुन डॉक्टर, वकील शोधतात.
👹 अनेकदा नोकरी आडनाव बघुन मिळते किंवा आडनाव बघुन दिली जात नाही.👹 मुले-मुली आडनाव बघुन शोधली जातात.
👹 अनेक उदाहरणे देता येतील
बौद्ध धम्म हा मानवातेला प्राधान्य देणारा धर्म आहे.
भारत देशाचा 'स्वदेशी', विश्वात मान प्राप्त केलेला अशा सुसंकृत बौद्ध धम्मातील माणुसकी ला सुशोभित करणारी नावे-आडनावे आहेत.
हि लिंक पहा:
तसेच काही जण 'भारतीय', 'मानव' अशी आडनावे धारण करू शकतील, कोणी त्यांच्या गावाची नावे ठेऊ शकतील.
> ☀️ जाती अंताचा लढा हाती घेतलेल्यांनी, धर्मनिरपेक्ष-मानवतावादी विचारसरणीच्या सर्व लोकांनी आडनावे बदलावी.
> ☀️ एका नविन मानवी पर्वाची ती सुयोग्य सुरुवात असेल.
> ☀️ विषमतावादी विचारसरणी पासून एक पाऊल लांब ;
> ☀️ विषमतावादी विचारसरणी पासून एक पाऊल लांब ;
> ☀️ आणि समतावादी विचारसरणीच्या एक पाऊल जवळ ; जायचे असल्यास -
> *आडनाव बदला. ☀️*
```सामाजिक, सांस्कृतिक संस्थांनी ही कामे हाती घेतली पाहिजे. ✊```
☸☸☸
*येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जय्यत तयारीला सुरुवात करू या.*
```_*धम्मदीक्षे सोबत नाव-बदलुया.*_```
⭐
नाव बदलने सोपे आहे. सर्व प्रोसीजर ऑनलाइन आहे.
Procedure :
२. येथे रेजिस्टर करुन लॉगिन करा.
३. 'industries, energy and labour department' येथे क्लिक करा
४. 'Directorate of Govt Printing and Stationary' येथे क्लिक करा
५. 'change in name'
६. फॉर्म download करा.
७. सर्व रकाने व्यवस्थित भरा.
८. JPEG फोटोग्राफ (साइज़ 5KB to 20KB) जोडा (upload करा)
९. कास्ट सर्टिफिकेट जोडा (upload करा).
१०. आधार कार्ड किंवा शाळा-सोडल्याचा दाखला जोडा
११. पैसे भरा (३००-५०० रुपये लागतील)
१२. आणि १-२ महिन्यात तुम्हाला SMS येईल
१३. एकदा गॅजेट मध्ये नाव बदल झाला की इतर कागदपत्रे सहज उपलब्ध करता येतात.
🙏 नमो बुद्धाय 🙏
☸ जय भीम ☸
🙏 जय भारत🙏
No comments:
Post a Comment